Wednesday, August 17, 2022

देवाचिये द्वारी - ३९

 


आता रजोगुण हा सुटेना I संसारिक हे तुटेना I

प्रपंची गुंतली वासना I यास उपाव कोण II

 

उपाये एक भगवद्भक्ती I जरी ठाकेना विरक्ती I

तरी येथानुशक्ती I भजन करावे II

 

काया वाचा आणि मने I पत्रे पुष्पे फ़ळे जीवने I

ईश्वरी अर्पूनिया मने I सार्थक करावे II

 

येथानुशक्ती दानपुण्य I परी भगवंती अनन्य I

सुखदुःखे परी चिंतन I देवाचेचि करावे II

 

 

श्रीसमर्थ केवळ आपल्यासमोर रजोगुण लक्षणे मांडूनच थांबत नाहीत तर त्यातून आपण प्रापंचिकांनी बाहेर कसे यावे याचाही मार्ग आपल्याला दाखवताहेत. रजोगुणी प्रापंचिकांनी यथाशक्ती भगवंताचे भजन, पूजन करावे, भगवंताला आपले मन अर्पण करावे. आपापल्या शक्तीनुसार दानधर्म करावा, भगवंताशिवाय आपल्याला कुणीही नाही याचे मनन करून दुःखात आणि सुखातही त्याचेच चिंतन करीत करीत रहावे म्हणजे रजोगुणाच्या प्रभावातून आपल्याला थोडे बाहेर पडता येईल.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण षष्ठी शके १९४४ , दिनांक १७/०८/२०२२)


No comments:

Post a Comment