Friday, August 12, 2022

देवाचिये द्वारी - ३४

 


तोंडी सीवी असो नये I दुस-यांस देखोन हासो नये I

उणे अंगी संचारो नये I कुळवंताचे II


येकाचा घात करू नये I लटिकी गोही देऊ नये I

अप्रमाण वर्तू नये I कदाकाळी II


समयी यावा चुको नये I सत्वगुण सांडो नये I

वैरियास दंडो नये I शरण आलिया II


उत्तम पुरूषाच्या तोंडात शिव्या नसाव्यात, दुस-यांचे, आपल्या वंशजांचे उणे पाहून हसू नये, कुणाचाही घात करू नये किंवा कधीही खोटेपणाने वागून खोटी साक्ष देऊ नये, सत्वगुण सोडून देऊन कुणाच्याही कठीण प्रसंगी त्याला मदत करणे सोडू नये आणि वैरी जरी शरण आला तर त्याला शिक्षा करू नये असे प्रतिपादन श्री समर्थ दुस-या दशकाच्या उत्तम लक्षण नावाच्या दुस-या समासात करताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण पौर्णिमा / कृष्ण प्रतिपदा शके १९४४ , दिनांक १२/०८/२०२२)

No comments:

Post a Comment