भगवद्भक्ती हे उत्तम I त्याही वरी सत्समागम I
काळ सार्थक हाचि परम I लाभ जाणावा II
नरदेही आलिया येक I काही करावे सार्थक I
जेणे पाविजे परलोक I परम दुर्लभ जो II
जन्मा आलियाचे फ़ळ I काही करावे सफ़ळ I
ऐसे न करता निर्फ़ळ I भूमिभार होये II
नरदेहाचे उचित I काही करावे आत्महित I
यथानुशक्त्या चित्तवित्त I सर्वोत्तमी लावावे
II
एकदा हा मनुष्यजन्म प्राप्त जाला की एकंदर कसे
वागावे याचे निरूपण श्रीसमर्थ भक्तिनिरूपण नावाच्या या समासात करताहेत. नरजन्माचे काही
सार्थक आपल्याला करून घ्यायचे असेल तर भगवंताची भक्ती, संतांची संगत करून आणि आपल्या
शक्तीनुसार आपले मन आणि धन परमेश्वराच्या कार्याकरिता वेचले पाहिजे. नाहीतर नरजन्माचे
सार्थक होणार नाही.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण कृष्ण तृतीया शके १९४४ , दिनांक १४/०८/२०२२)
No comments:
Post a Comment