Tuesday, August 9, 2022

देवाचिये द्वारी - ३१

 


कोठे मठ करू नये I केला तरी धरू नये I

मठपती होऊन बैसो नये I निस्पृह पुरूषे II


निस्पृहे अवघेचि करावे I परी आपण तेथे न संपडावे I

परस्परे उभारावे I भक्तिमार्गासी II


हे शिकवण धरिता चित्ती I सकळ सुखे वोळगती I

अंगी बाणे महंती I अकस्मात II


ज्या मनुष्याला समाजात खरोखर भक्तिमार्ग वाढवायचा असेल त्याने काय केले पाहिजे हे श्री समर्थ या निःस्पृहलक्षण नावाच्या या समासात आपल्याला सांगताहेत. मठ उभारणे आणि संसारी पुरूष ज्याप्रमाणे संसाराच्या चिंतेत आपले आयुष्य़ घालवतो त्याप्रमाणे आपण उभारलेल्या मठाच्या व्यवस्थापनाच्या चिंतेत आयुष्य घालवणे हे समर्थांनी निषिद्ध सांगितलेले आहे. याउलट लोकसंग्रह करीत भक्तीमार्गाची शिकवण देऊन, आपण स्वतःचे महत्व तेथे न वाढवता अनेक लोकांकरवी कार्य केले तर ते सगळ्यांसाठी सुखाचे होते हा श्री समर्थांचा दृढ विश्वास आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध द्वादशी, शके १९४४ , दिनांक ०९/०८/२०२२)

No comments:

Post a Comment