Wednesday, August 10, 2022

देवाचिये द्वारी - ३२

 


कलयुगी कीर्तन करावे I केवळ कोमल कुशल गावे I

कठीण कर्कश कुर्टे सांडावे I येकीकडे II


खटखट खुंटून टाकावी I खळखळ खळांसी न करावी I

खरे खोटे खवळो नेदावी I वृत्ती आपुली II


गर्वगाणे गाऊ नये I गाता गाता गळो नये I

गौप्य गुज गर्जू नये I गुण गावे II


कलियुगात भगवंताचे नाम संकीर्तन करताना कठोर, कर्कश्श आणि किरटे न गाता, कोमल आणि कौशल्यपूर्ण गायन करावे. खलप्रवृत्तीच्या व्यक्तींच्या अकारण वाद विवादांना कीर्तनातून उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत पडू नये आणि कीर्तनातून आपल्या व्यक्तीत्वाचा, कलेचा गर्व धरून कीर्तन करू नये. फ़क्त ज्यासाठी कीर्तन करतोय, त्या भगवंताचे कीर्तन करावे असा उपदेश आपल्याला समर्थ करताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक १०/०८/२०२२)

No comments:

Post a Comment