माझे घर माझा संसार I देव कैचा आणिला थोर I
ऐसा करी जो निर्धार I तो रजोगुण II
माता पिता आणि कांता I पुत्र सुना दुहिता I
इतुकियांची वाहे चिंता I तो रजोगुण II
मी तरूण मी सुंदर I मी बलाढ्य मी चतुर I
मी सकळांमध्ये थोर I म्हणे तो रजोगुण II
श्रीसमर्थांनी सत्व, रज , तमो गुणांसाठी दुस-या
दशकात एकेक समास लिहीलाय. त्यात सर्वप्रथम रजोगुणनिरूपण समास लिहीलाय. आपण सर्व संसारी
व्यक्ती ह्या जास्तीत जास्त रजोगुणीच असतो म्हणून त्याचे निरूपण श्रीसमर्थांनी पहिल्याप्रथम
केलेले आहे.
मी, माझे कुंटुंबिय, माझा संसार याच चक्रात राहणा-या
आणि त्याचीच सदैव चिंता करणा-या मनुष्यमात्रांमध्ये रजोगुण असतो. मी म्हणजेच माझा देह
असे मानून देहावर, देहाच्या सौंदर्यावर, शक्तीवर प्रेम करणा-या व्यक्तींमध्ये रजोगुणाचे
प्राबल्य आहे असे श्रीसमर्थ सांगताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण कृष्ण पंचमी शके १९४४ , दिनांक १६/०८/२०२२)
No comments:
Post a Comment