परपीडेचे वाही दुःख I परसंतोषाचे सुख I
वैराग्य देखोन हरिख I मानी तो सत्वगुण II
परभूषणे भूषण I परदूषणे दूषण I
परदुःखे सिणे जाण I तो सत्वगुण II
सत्वगुणे भगवद्भक्ती I सत्वगुणे ज्ञानप्राप्ती
I
सत्वगुणे सायोज्यमुक्ती I पाविजेते II
सत्वगुणी मनुष्य दुस-या जीवांना स्वतः दुंख देणे
तर सोडूनच द्या पण दुस-या जीवांना इतर काही कारणांनी दुंख झाले तरी स्वतः दुखावतो,
इतरांच्या सुखात स्वतः सुखावतो, एखाद्याचे वैराग्य पाहून त्याला मनोमन आनंद होतो. असा
हा सत्वगुणी मनुष्य दुस-यांची स्तुती करण्यात आनंद मानतो आणि दुस-यांची निंदा करण्यात
दूषण मानतो त्या मनुष्याला खरी ज्ञानप्राप्ती होऊन सायुज्यमुक्ती मिळते असे श्रीसमर्थ
आपल्याला निवेदन करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण कृष्ण एकादशी, शके १९४४ , दिनांक २२/०८/२०२२)
No comments:
Post a Comment