जो परमार्थाचे मंडण I जो महंतांचे भूषण I
रजतमाचे निरसन I जयाचेनि II
जो परम सुखकारी I जो आनंदाची लहरी I
देऊनिया निवारी I जन्ममृत्यू II
जो अज्ञानाचा शेवट I जे पुण्याचे मूळ पीठ I
जयाचेनि सापडे वाट I परलोकाची II
रजोगुण, तमोगुणाचे वर्णन केल्यानंतर श्रीसमर्थ
दुस-या दशकाच्या सातव्या समासात सत्वगुणाचे महत्व निवेदन करताहेत. ज्याने रजोगुण आणि
तमोगुणांचे निरसन होते, जो अत्यंत सुखकारक असून मनुष्यमात्राला ख-या आनंदाचा लाभ करून
देतो आणि जन्म मरणाच्या फ़े-यातून मुक्त करवितो, जो पुण्याचे मूळ असून ज्यामुळे अज्ञानाचा
नाश होऊन आपल्याला ख-या अध्यात्माची वाट सापडते असा हा सत्वगुण श्रीसमर्थ वर्णन करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(श्रावण कृष्ण नवमी, शके १९४४ , दिनांक २०/०८/२०२२)
No comments:
Post a Comment