Tuesday, June 16, 2020

यक्षप्रश्नाचे सोपे उत्तर.

कुठल्याही प्रौढ स्त्रीने, स्वतःचे कपडे वगैरे खरेदीसाठी,
नवर्याबरोबर जावे ?
की
स्वतःच्या १८ + मुलीसोबत जावे ?
असा प्रश्न पडला तर...
...बिनधास्त नवर्याबरोबर खरेदीला जाण्याचा पर्याय निवडला पाहिजे या मताप्रत मी आलेलो आहे.
१८ + मुलीसोबतच्या खरेदीत आईला प्रचंड सूचनांना सामोरे जावे लागते. स्वतःच्या इच्छेला मुलीच्या मताप्रमाणे मुरड घालावी लागते.
"आई, तुला हे चांगले दिसणार नाही, हे शोभणार नाही."
"अरे अजून मीच तर हे घेतले नाही, तू कशाला घेते ?"
वगैरे अनंत प्रश्नांची, विचारांची दडपणे बिचार्या आईवर असतात.
(हा मुलींचा वयोगट १८ ते इन्फिनिटी आणि आयांचा वयोगट ४० ते इन्फिनिटी असा गृहीत धरला पाहिजे.)
नवर्यासोबत असताना, नवरा बिचारा पत्नीच्या सगळ्या इच्छांना (त्याला स्वतःला त्यातले फारसे कळत नसल्याने) निमूटपणे मान्यता देत असतो.
त्यामानाने मुलगा आणि वडील या दोघा जोडगोळीची खरेदी एकदम 'कूल' असते. मुलेच वडीलांना छान छान आणि ट्रेंडी कपडे निवडायला मदत करतात असे दृश्य सर्वत्र दिसते.
- आमच्या सासूबाई आणि सुपत्नी, तसेच सुपत्नी आणि सुकन्या या दोन वेगवेगळ्या गटांच्यासोबत खरेदीसाठी फिरण्याचा दांडगा अनुभव असलेला गृहस्थाश्रमी मनोव्यापारतज्ञ रामचंद्रपंत.

No comments:

Post a Comment