Thursday, June 4, 2020

काही अनुत्तरीत प्रश्न.

पुलंना जसे प्रश्न पडले होते की
१. सगळे कल्हईवाले जाकीट का घालतात ?
२. सगळ्या पानवाल्यांच्या कडल्या कात्र्यांची टोके मोडकी का असतात ?
तसाच एक प्रश्न आज मलाही पडलाय.
"सगळे सलूनवाले १९९० च्या दशकातल्या (अण्णू मलिक, उदित नारायण, कुमार सानू, अलका याज्ञिक, साधना सरगम इ.इ. छाप) गाण्यांचे फॅन्स का असतात ?
मी आजवर मुंबई, नवी मुंबई, नागपूर, कराड, चंद्रपूर, धामणगाव, सांगोला, शिरपूर, धुळे, सोलापूर इथल्या पाचएकशे तरी सलूनचा प्रवास करून आलोय. बर्याच जागी हल्ली अरिजीत सिंग फॅन क्लबच्या वयाची तरूण पीढीही मोठ्या जोमाने आणि निष्ठेने हा व्यवसाय पुढे नेताना दिसतेय.
पण दुकानातल्या १४ इंची टी.व्ही. वर गाणी म्हणाल तर
"तुम्हे अपना बना ने की कसम "
नाहीतर
"हमको तुमसे प्यार है" छापाचीच.

- लाॅकडाऊन मध्ये डोईवरील केसांचा भार असह्य झालेला आणि हेअर कटिंग सलून चालू होण्याची चातकासारखी वाट पाहणारा, राम.

No comments:

Post a Comment