Saturday, June 13, 2020

आजकालचे समाजमन आणि एकंदर सामाजिक जाणीवा

फेसबुकवरील "Bio" सदरात जर मी
"ज्ञानियाचा वा तुकयाचा
तोच माझा वंश आहे."
असे लिहीले तर लगेच
"म्हणजे किन्हीकर, अहो तुम्ही ब्राह्मण की मराठा ?"
अशी पृच्छा येण्याइतपत आपले साहित्यिक भान आपण गमावलेले आहे आणि आपले समाजमन दुभंगलेले आहे.
बरं Bio मध्ये
"कुणा न दिसले
आजवर कधी
हात अनाम त्या
विणकराचे"
असे लिहावे तर राम किन्हीकर हा नक्की गिरणी कामगारांच्या किंवा हातमाग कामगारांच्या हक्कासाठी लढणार्या संघटनेचा नेता वाटण्याची शक्यताच जास्त.
जिथे २० व्या शतकातल्या माडगूळकर, विंदा, कुसुमाग्रजांचीच ही कथा मग
"अलिकुलवहनाचे वहन आणित होते,
शशिधरवहनाने ताडिले मार्गपंथे..."
वगैरे पंतकाव्ये आम्हाला संस्कृतमधली वाटली तर नवल ते काय ?
"अरे बावीस म्हणजे ट्वेंटी टू" अशा प्रकारेच आपली मातृभाषा समजणार्या आणि समजावून देणार्या आजच्या "महाराष्ट्रीय" जनतेला आदरयुक्त वंदन.
- भाषेत आणि जगण्यातही, बाळबोध वळण जपून ठेवण्याची पराकाष्ठा करणारा बालक कुमार राम प्रकाश किन्हीकर.


No comments:

Post a Comment