Monday, June 15, 2020

पावसाचा फोटो.

१२ जून, २०१५.
नरसी मोनजी विद्यापीठाच्या शिरपूर कॅम्पसमधे आम्ही सगळे कार्यालयीन कामात गर्क. कॅम्पस अगदी तापी नदीच्या तीरावर.
थोड्या वेळापूर्वी पाऊस सुरू झाल्याचे जाणवत होते. आमच्या कार्यालयीन जागेत वातानुकूलन यंत्रणा आणि खिडक्यांना ब्लाइंडस असल्याने पाऊस तेवढा जाणवला नाही.
अचानकच ब्लाइंडस बाजूला करून बाहेर डोकावलो तर डोळ्यांचे पारणे फेडणारी ही अप्रतिम दृश्ये.
पटकन हाताशी असलेल्या अगदी साध्या मोबाईलमधून टिपलीत.



आजवर अनेक रांगोळ्यांचे फोटो आपण "हा फोटो नाही, ही रांगोळी आहे." या सदराखाली आपण बघितले असतील.
पण चित्र काढलय किंवा रांगोळी सजवलीय असे वाटणारा हा फोटो. निसर्गाने अचानकच उधळलेल्या वैभवाचा.
- निसर्गवेडा छायाचित्रकार राम.


No comments:

Post a Comment