Monday, June 22, 2020

मेघवर्णम शुभांगम

गडद निळे गडद निळे
जलद भरूनी आले
शीतलतनु चपलचरण
अनिलगण निघाले.

बरोबर ११ वर्षांपूर्वी लोणारला काढलेल्या या फोटोकडे पाहिल्यावर, बाकीबाब बोरकरांच्या या कवितेची आठवण न होते तरच नवल.
"मेघवर्णम शुभांगम" म्हणजे काय याचा अचानकच सुंदर साक्षात्कार होणारा हा क्षण.
"कुठे काय उत्कट अनुभव येईल हे सांगता न येणे" याला जीवन ऐसे नाव ही जीवन नामक रेसिपीची अस्मादिकांनी केलेली नवीन व्याख्या.
- जीवन्या, ल्यका तु कधी काय करशील याचा नेम नाही बाबा ! असे म्हणत अगदी मकरंद अनासपुरे स्टाईलमध्ये खिदळणारा राम नागपुरे.

No comments:

Post a Comment