Sunday, June 21, 2020

व-हाडी भाषा आणि मराठी चित्रपटसृष्टी

मुंबई पुणे आणि नाशिक च्या पुढे महाराष्ट्र न बघितलेल्या लेखक दिग्दर्शकांनी टी. व्ही. आणि मराठी सिनेमात वर्हाडी भाषेविषयी खूप गैरसमज करून घेतलेले (आणि पूर्ण महाराष्ट्राच्या माथी मारलेले) आहेत.
"नाळ" मधला नागराज अण्णा आणि ओम भूतकर या दोघांनीही वर्हाडी भाषा बोलण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न जाणवतो. सर्वत्र परफ़ेक्शनचा आग्रह धरणा-या नागराज अण्णाकडून ही चूक कशी झाली कोण जाणे ?
अस्सल नागपुरी लेखक असूनही "माझ्या नवर्याच्या बायको"त ली भैताड ओढूनताणून केलेली नागपूरकर वाटते हे मात्र अक्षम्य आहे.
नुसत "काऊन" आणि "बाप्पा" तोंडात असल म्हणजे नागपूरकर, हा एक भ्रम आहे.
"हेंबाडथुतर्या" "नसानकुकड्या" "मसन्याउदा" "चिलीमतोंड्या" "लमच्या" " बुहार्या वानाच्या" "भोकनटिकल्या" अशा जहाल शिव्या अगदी सहज लहेज्यात निघाल्या पाहिजेत, राजेहो.
- पूर्ण महाराष्ट्रभर फिरून वर्हाडी, मालवणी, अहिराणी, सातारी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी आणि मराठवाडी भाषेचा अभ्यासक आणि महाराष्ट्रातील समग्र बोलीभाषा प्रेमी प्रा. राम.


No comments:

Post a Comment