दूरदर्शनची सह्याद्री वाहिनीही अत्रंगच आहे.
"चिमणरावां"ना प्रेक्षकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून त्याच वेळात त्यापाठोपाठ त्यांनी "श्वेतांबरा" सुरू केली.
हे म्हणजे एखाद्या IPL मॅचमधे लाराची बॅटींग बघितल्यावर, तो आऊट होताच, लगेच दिनेश मोंगियाची बॅटींग बघण्याचे नशिबात यावे.
नाहीतर मार्क वाॅ ची सुंदर कवितेसारखी बॅटींग बघितल्यावर लगेच स्टीव्ह स्मिथची मराठी सौंदर्यशास्त्रावरच्या निबंधाइतकीच कुरूप बॅटींग बघणे नशिबात यावे.
एकदा आम्ही सगळे एकत्र जेवत असताना कन्यारत्नाने श्वेतांबराचा एक भाग बघितला आणि जेवण झाल्यावर मला प्रश्न केला,
"बाबा, ही सिरीयल पहिल्यांदा लागली तेव्हा तू कितवीत होतास ?"
"असेन सहावी सातवीत. का गं ?" अस्मादिक.
"तुला त्यावेळी ही मालिका आवडली होती ?" पुन्हा तिचा प्रश्न.
"अगं, आवडायला ती पहिल्यांदा नीट कळायला तर हवी ना."
तिचा माझ्याविषयीचा आदर दुणावला असावा. आपला बाबा हा त्याच्या बालपणी आपल्यासारखाच नाॅर्मल आणि sensible असला पाहिजे या मुद्द्यावर तिने मनातल्या मनात शिक्कामोर्तब केले असावे, नक्कीच.
- भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी कुठल्याही काळात श्वेतांबरा पचनी न पडू शकणारा नाॅर्मल गृहस्थ रामचंद्रपंतराव.
No comments:
Post a Comment