Tuesday, June 9, 2020

देवर्षी नारद

परवा देवर्षी नारद जयंती झाली. इथे असलेल्या विविध ग्रुप्सवरून नारदांच्या जीवनातल्या बर्याच पौराणिक कथा वाचायला मिळाल्यात. श्रीमदभागवतातही देवर्षी नारदांचा संचार बर्याच ठिकाणी होतो.
सगळ्या कथांचे अवलोकन केले असता लक्षात आले की ज्या ज्या वेळी देवर्षी नारदांनी एखाद्या गोष्टीत प्रवेश केलाय त्या त्या वेळी आपल्या कर्तृत्वाने ती गोष्ट सुखांतिकेत बदलली आहे.
आपले जीवनही सुखात्म व्हावे असे वाटत असेल, तर देवर्षींचा आदरपूर्वक (कलियुगात आपण वापरत असलेली भलतीसलती दूषणे न लावता) उल्लेख सदैव करत जाऊयात.
आणि...
आपल्याही कर्तृत्वाने जगात शोकांचा नाश होऊन, सुखात्म वृत्तींची वाढ व्हावी असे प्रयत्न जाणीवपूर्वक करूयात.

- शेवटचा दिवस तर गोड व्हावाच पण त्याआधीचे बहुतांशी दिवस गोडच व्हावेत ही प्रामाणिक इच्छा मनात बाळगणारा सर्वसामान्य भक्त, राम.


No comments:

Post a Comment