Wednesday, October 14, 2020

समुद्र : माझा दोस्त

 साधारण ७० च्या दशकातल्या जुन्या हिंदी किंवा मराठी सिनेमांमध्ये मुंबईचा समुद्र दाखवलेला असला की मी कासावीस होतो. आजच्या बकाल पार्श्वभूमीवर त्याचं गतवैभव मला अस्वस्थ करून जातं.

अगदी १९९५ ला मी मुंबईकर झाल्यावरही मुंबईच्या समुद्राच वैभव मला भुरळ घालायचंच. सवड मिळाली की समुद्रावर खूप वेळा धाव घ्यायचो. हळूहळू बकाल होत जाणारी मुंबई आणि निळ्या समुद्राचा काळा समुद्र होत जाताना हताश मनाने बघत असायचो.
२०१५ -१६ या शैक्षणिक वर्षात जवळपास दर शनिवारी आचार्य पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करायला मुंबईत असायचो. माझ्या महाविद्यालयापासून समुद्र अगदी हाकेच्या अंतरावर असे. (जेव्हीपीडी स्कीम ते जुहू) पण दरवेळी अगदी जुहूत जाऊनही या माझ्या दोस्ताला मुद्दाम भेटावं असं मला एकदाही वाटले नाही.
या दोस्ताला मनसोक्त भेटता यावं म्हणून मी अगदी कोकण, गोवा, केरळ आणि कन्याकुमारीपर्यंत जाऊन आलोय. मस्त बागडलोय. पण मुंबईतलं त्याचं रूपडं आजकाल बिलकुल बघावसं वाटत नाही.
- (फारसा जुना नसला तरीही जुनाच) मुंबईकर


Vagator, Goa, 2012

No comments:

Post a Comment