"कोई चले हाथी घोडा
पालकी मंगाइके,
साधू चले नंगे पाँव,
चीटियाँ बचाइके."
हे जग फक्त माझ्यासाठी अस्तित्वात आलेले नाही. या जगाचा केंद्रबिंदू मीच काय ? कुठलाही मानव होऊ शकणार नाही.
मग या सृष्टीत आल्यानंतर, मी या सृष्टीचे काही भले केले नाही तरी चालेल, पण माझ्या अस्तित्वामुळे या सृष्टीला त्रास होऊ नये असे जगून दाखविता आले पाहिजे.
अजाणतेपणी, केवळ आपल्या मानवी अस्तित्वामुळेच, या पृथ्वीवर काही अपराध घडत असतील तर त्याला इलाज नाही, पण जाणीवपूर्वक इथे आपल्याकडून या जीवसृष्टीचे शोषण व्हायला नको ही भावना ठेवली तर, आपणा सर्वांनाच ज्ञानोबांच्या
"किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊन तिन्ही लोकी"
चा प्रत्यय घेता येईल, नाही ?
No comments:
Post a Comment