Saturday, October 10, 2020

दिग्दर्शकीय डायरीतली टिपणे, Notes to Myself

 कधीकधी आठवणींमधून २५ वर्षांपूर्वीचे आपणच आपल्याला भेटतो.

पण "तो मी" हा "हाच मी" आहे यावर विश्वास न बसण्याइतपत आपल्यामध्ये बदल झालेला असतो.
तसेही दर ७ वर्षांनी शरीरातल्या संपूर्ण पेशी नवीन असतात म्हणे. (म्हणजे पेशींमधे बदल क्षणोक्षणी होतच असतो. आणि असा बदल होत होत आजपासून ७ वर्षांनी ज्या पेशी माझ्या शरीरात असतील त्यातली एकही पेशी माझ्या शरीरात आज असलेल्यांपैकी नसेल. झालो की नाही मी ७ वर्षांमध्येच दुसरा राम ?)
म्हणजे गेल्या २५ वर्षात मी साडेतीन वेळा पूर्ण बदललेला असेन, नाही ?
आजच्या मलाच पूर्णपणे अनोळखी असा नाट्यदिग्दर्शक, नाट्यकलावंत प्रा. राम किन्हीकर. नाटकाच्या दिग्दर्शनाच्या नोटस काढणारा, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनेचे अचूक नियोजन व्हावे म्हणून आग्रही असणारा असा १९९५ चा राम.





धामणगाव रेल्वे येथल्या फक्त वर्षभराच्या वास्तव्यात तिथल्या प्रगल्भ नाट्यसृष्टीत मनसोक्त विहरणारा, रमणारा अभिनेता / दिग्दर्शक राम आज जुन्या कागदांमधून भेटला.

सादर आहे
योगेश सोमण लिखित,
राम किन्हीकर दिग्दर्शित
थरारक एकांकिका
"रिंग अगेन"
बद्दलच्या
"Notes to Myself"




No comments:

Post a Comment