प्रिय मराठी व्हाॅटसॅप कवींनो,
(आणि शहानिशा करण्याची इच्छा न बाळगता त्या शिळ्या उसन्या भावना फाॅरवर्ड करणार्यांनोही),
अरे तुमच्या टुकार कविता पुल आणि वपुंच्या नावावर खपवू नका.
ठीकाय, मी समजू शकतो. आपली अती भंगार भावना आणि तितकेच टुकार शब्द वापरून उतरलेली अभिव्यक्ती नाकारून वाचक (शाब्दिक का होईना) हाणतील ही तुमची भीती मी समजू शकतो. पण एखाद्या कवीला त्याच्या अती भंगार कवितेसाठी हाणल्याचा (महाराष्ट्रात तरी) इतिहास नाही.
तेव्हा, पुल आणि वपु या नावांच्या ढालीमागे दडणे थांबवा. खर्या नावाने येऊदेत तुमच्या कोमट अभिव्यक्तीच्या कविता.
बाकी व्हाॅटसॅप हे माध्यम स्वतःजवळ नसलेली, पण इकडून तिकडून ढापलेली, उसनी विद्वत्ता मिरवायला अत्यंत सोयीचे आहे. एकतर कुणी गांभीर्याने वाचत नाही. नुसते इकडून तिकडे फाॅर्वर्ड करतात.
बाकी तुमच्या ज्ञानात मराठीत पुल आणि वपु हे दोन लेखक "कवी" म्हणून असावेत यातच तुमची दळभद्री प्रतिभा दिसतेय.
वाचन वाढवा रे. बोरकर, बी, पाडगावकर, करंदीकर, बापट, नारायण सुर्वे इत्यादी नावे ऐकलीत का कधी ?
— एखादी अत्यंत टुकार अभिव्यक्ती पुल किंवा वपुंच्या नावावर खपवलेली पाहताना त्या कवीला मोठ्यात मोठ्या ग्राइंडरमध्ये टाकून ते ग्राइंडर फिरवण्याची इच्छा असणारा "पाताळविजयम" चा मद्रासी राक्षस के. रामकुमारा.
No comments:
Post a Comment