जुन्या काळी दुकानांच्या पाट्यांवर पत्ता पिनकोडसकट सगळे लिहीले असे.
Saturday, October 31, 2020
दुकानांवरील पाट्यांची बदलत जाणारी संस्कृती.
Friday, October 30, 2020
जशास तसे : मराठी मंडळी आणि दगड सिनेमे
सोनीमॅक्स म्हणा किंवा इतर कुठलेही सिनेमांचे चॅनेल्स म्हणा. वर्षाच्या, दिवसाच्या कुठल्याही एका वेळेस त्यांच्यावर
Thursday, October 29, 2020
वाहन उद्योगातले १९८० च्या दशकातले आवश्यक बदल. टाटा, लेलॅण्ड आयशर स्वराज वगैरे.
१९८० च्या दशकापर्यंत भारतात टाटा आणि अशोक लेलॅण्डच्या मोठ्या (१० चाकी, २ ऍक्सल्सच्या) ट्रक्सचीच चलती होती. कमी मालाच्या वाहतुकीसाठी छोट्या ट्रकची आवश्यकता असते वगैरे कुणाच्या गावीही नव्हते.
Wednesday, October 28, 2020
काही अति उपेक्षित वैदर्भिय फ़ळे आणि रानमेवा.
ज्या फळाच्या आठोळीतून चारोळ्या मिळतात ती "चारं" (यातल्या "च" चा उच्चार "चूल" शब्दासारखा),
Tuesday, October 27, 2020
दीन दुःखी का कष्ट घटाऍ, भारत स्वर्ग बनेगा.
अभियांत्रिकी क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून अध्यापन करीत असताना दोन वर्षांपूर्वी अचानक एक विलक्षण बातमी वाचनात आली. डेन्मार्क आणि हॉलंड ही युरोपीय राष्ट्रे त्यांच्या दूध दुभत्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत दूध दुभत्याच्या अर्थकारणाचा भाग २० % आहे. तिथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये याच व्यवसायाला लागणा-या यंत्रांच्या निर्मितेचे, आधुनिकीकरणाचे आणि तत्सम संशोधनाचे जास्तीत जास्त कार्य चालते. दूध दुभत्याच्या या व्यवस्थेला केंद्रीभूत मानूनच त्यांनी आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आणि मनुष्यबळाची आखणी केलेली आहे. म्हणजे तिथला एखादा इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअर दुग्धव्यवसायाला लागणा-या इंस्ट्रूमेंटेसचीच आखणी, उभारणी आणि देखभालीचे शिक्षण घेईल. उगाचच शिकागो, तोक्यो, शांघाय मधल्या मोटार व्यवसायात काय नवनवीन इंस्ट्रूमेंटस लागतायत यावर तो आपली बुद्धी आणि वेळ खर्च करणार नाही आणि नासा मध्ये जाऊन अवकाश संशोधनासाठी लागणा-या इंस्ट्रूमेंटसची तो कल्पनाही करणार नाही. जी गोष्ट इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअरची तीच मेकॅनिकल इंजिनीअरची, तीच इलेक्टॉनिक्स इंजिनीअरची. सगळे आपापल्या क्षेत्रात संशोधन करतील पण त्याची उपयुक्तता देशाच्या विकासात योगदान देणा-या मुख्य व्यवसायाला असेल असेच एव्हढेच आणि इतपतच.
एका सुंदर रांगोळीची आठवण
दिवाळी २०१३. धनत्रयोदशीचा दिवस.
Monday, October 26, 2020
MSRTC's Yashwanti service
Sunday, October 25, 2020
सलमान खान, श्रद्धा कपूर आणि त्यांच्या चाहत्यांचा एकत्रित बुध्द्यांक.
अगदी "मैने प्यार किया" आणि "हम आपके है कौन ?" यशस्वी असल्याच्या दिवसांपासूनच मला सलमान खान या इसमाच्या (आणि खासकरून त्याच्या चाहत्यांच्या) एकंदर (एकत्रित) बुध्दीमत्तेविषयी दाट शंका होती. हळुहळू खात्री पटलीय.
Saturday, October 24, 2020
माझे शतक : यावर्षीच्या ब्लॉगपोस्टचे.
२००८ च्या डिसेंबरमध्ये हा ब्लॉगलेखनाचा प्रवास सुरू केला. सुरूवातीला वाचकांचा प्रतिसाद कमी होता आणि मी सुद्धा त्याबाबत फ़ारसा गंभीर नसावा.
Friday, October 23, 2020
काही श्रेष्ठ भागवत (प्रल्हाद)
प्रल्हादाचेही चरित्र आपणा सगळ्यांना ढोबळमानाने माहिती आहेच. अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला.
श्रीमदभागवतात देवर्षि नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षिंचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षिंना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.
देवर्षिंचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.
प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?
आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. भगवंत, सदगुरू परीक्षा तरी कशी पाहतात ? एक उर्दू कवी म्हणतो,
मुझे जो कराना था पथ पार
बिठाए उसपर भूत पिशाच्च
रचाए उसमे गहरे गर्न
और फ़िर करने आया जांच.
ज्या भक्ताचा सदगुरूवचनांवर दृढ विश्वास असेल तेच यातून तरून त्याच्याजवळ पोहोचतात.
"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.
निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ? त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध सप्तमी, २३/१०/२०२०)
या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांचे माझ्या मेंदूने केलेले फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)
आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.
तुझेच देणे तुलाच अर्पण.
Monday, October 19, 2020
काही श्रेष्ठ भागवत (धृव)
धृवबाळाचे चरित्र आपण सगळ्यांनीच आपापल्या बालपणी ऐकलेले आहे. उत्तानपाद राजा, त्याच्या दोन राण्या, सुरूचि आणि सुनीती. सुरूचि आवडती तर सुनीती नावडती. आणि मग धृवाचा पित्याच्या मांडीवर बसण्यावरून झालेला अपमान. त्याने वनात जाऊन देवर्षि नारदांच्या उपदेशानुसार केलेली तपश्चर्या आणि भगवंत त्याजवर प्रसन्न होऊन त्यांनी दिलेला वर आणि त्यामुळे धृवाला तारांगणात मिळालेले कायमचे आणि अढळ स्थान.
पण श्रीमदभागवतात याहीपेक्षा अधिक धृवाचे चरित्र आलेले आहे. अवघ्या पाच वर्षांचा बालक अपमान सहन न होऊन वनात जायला निघाल्यावर देवर्षि नारदांनी त्याला पहिला उपदेश हा मान अपमानाच्या पुढे जाण्या-या अशा वैराग्याचा केलेला आहे. श्रीगजाननविजय ग्रंथात गजानन महाराजांनी जसा बाळाभाऊंना "अरे, जन्मे न कोणी, मरे न कोणी" या ओवीत जो वैराग्यपूर्ण उपदेश केलेला आहे, तसाच. पण तरीही धृवबाळाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा भगवत्प्राप्तीसाठी "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्रपठणाचा उपदेश करून देवर्षि नारद तिथून निघून गेलेले आहेत.
धृवबाळाने पाच वर्षे तपश्चर्या करून भगवंतांना सगुण स्वरूपात प्राप्त करून घेतले आणि त्यांच्याकडून "अ च्युती" चा वरही प्राप्त केला पण नंतर त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि देवर्षि नारदांचा पहिलाच उपदेश न ऐकल्याबद्दल पश्चात्ताप झाला. "ज्या भगवंताला अनेक योगी, मुनी, साधक हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतरही प्राप्त करू शकत नाहीत त्याला मी अल्पशा तपाने प्राप्त केले पण त्यानंतर जे मागितले ते कधी ना कधी नष्ट होणारे सुखच मागितले. शाश्वत स्वरूपाच्या त्याच्या पदकमलांशी अतूट नाते मागायला मी विसरलो." अशी धृवाची भावना झाली आणि तो विषण्ण झाला. भागवतकार सांगतात की या आत्मसाक्षात्कारानंतरच धृवाची खरी उन्नती सुरू झाली. तो वैराग्याने वागत राहिला आणि त्या वैराग्यानेच परम पदाला प्राप्त झाला.
परम पूजनीय ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक दृष्टांत आहे. आई घराच्या कामात, व्यापात असली आणि तिचे मूल रडत असले की पहिल्यांदा ती मुला समोर खेळणी वगैरे टाकून त्याला रमविण्याचा प्रयत्न करते. तो जर त्या खेळण्यांमध्ये रमला तर ती पुन्हा आपले घरकाम आणि इतर व्याप सांभाळायला मोकळी होते. पण ते मूल खेळण्यांमध्ये न रमता जर "आईच हवी" म्हणून भोकाड पसरत राहिले तर त्याला कडेवर उचलून घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. तसेच भक्ताचे व्हायला हवे. भगवंत आपल्यामागील उपाधी टाळण्यासाठी भक्तांना या जगतातील अनेक सुखे प्रदान करतो, अनेक भौतिक खेळण्यांमध्ये त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करतो. पण भक्ताने या गोष्टींमध्ये न रमता जर भगवत्प्राप्तीचाच ध्यास घेतला तर भगवंताला आपले सान्निध्य भक्ताला द्यावेच लागते.
म्हणूनच मनाच्या श्लोकांमध्येही समर्थांनी
धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे। कृपा भाकितां दीधली भेटी जेणे ॥
चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥
असे या भगवत्भक्ताचे वर्णन केलेले आहे.
प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनापेक्षाही मनातील वैराग्यानेच एखादा मनुष्यप्राणी श्रेष्ठपद प्राप्त करू शकतो या शिकवणुकीसाठी हे धृवचरित्र श्रीमदभगवतात आलेले आहे. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीद खरे करणारा श्रेष्ठ भागवत धृवबाळ.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध तृतीया, १९/१०/२०२०)
या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)
आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.
तुझेच देणे तुलाच अर्पण.
Sunday, October 18, 2020
काही श्रेष्ठ भागवत (लेखमाला)
श्रीमदभागवतात भगवंताच्या आणि काही श्रेष्ठ भगवतभक्तांच्या चरित्रांचे वर्णन आलेले आहे. तसा श्रीमदभागवत हा ग्रंथच माणसाच्या मनात वैराग्य उत्पन्न करणारा आहे. "तत्र ज्ञानविराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे तर स्वतः श्रीमदभागवताचे चतुःश्लोकी भागवतातील वर्णन आहे. त्यातल्या कथा केवळ पुराणकथा नाहीत तर त्याचे नीट परिशीलन केले तर श्रोता, वक्त्यांच्या मनात तीव्र वैराग्य उत्पन्न करण्याची ताकद त्या कथांमध्ये आहे. त्यादृष्टीने श्रीमदभागवत हा एक प्रासादिक ग्रंथ आहे.
त्यात एकूण व्दादश स्कंध (खंड) आहेत. त्यातल्या दशमस्कंधात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे एकूण ९० अध्यायांमध्ये विस्तृत वर्णन केलेले आहे. ते दशमस्कंधचरित्र ऐकताना सदभक्तांची अवस्था अगदी भावविभोर होऊन जाते, भक्तांचे हृदय त्या परमात्म्याच्या लीलांच्या नुसत्या श्रवणाने भरून येते आणि म्हणूनच दशमस्कंधाला श्रीमदभागवताचे हृदय असे म्हटले जाते.
एकादश स्कंधात मात्र भगवंताने भक्ताबरोबर केलेली तत्वचर्चा आहे. त्यात ज्ञान आणि त्यातून प्राप्त होणारे वैराग्य आहे. एकादश स्कंधाची भाषा आणि त्यातला आशय कळायला कठीण आहे आणि म्हणूनच आपल्यासारखे सर्वसामान्य भक्त दशमस्कंधाचा अधिकाधिक आनंद घेताना दिसतात. श्रीमदभागवतकथेचे कलियुगातले बहुतांशी प्रवचनकारही दशमस्कंध सांगताना विशेष खुलतात आणि श्रोतृवर्गाच्या आनंदमहोत्सवात स्वतः बुडून जातात असे आपल्याला पहायला मिळते.
श्रीमदभगवतगीतेतही प्रत्यक्ष भगवंतांनी "ज्ञानाने मी प्राप्त होईन पण भक्तीने मी अधिक लवकर, कमी प्रयासाने प्राप्त होईन" असा उपदेश केलेला आहे. सर्वसामान्य भक्तांना भगवंताच्या लीलांचे नुसते श्रवण आणि कीर्तन यामुळे पाच हजार वर्षांनंतरही उचंबळून येते आणि म्हणूनच या भारतभूमीवर हे भक्तीचे बीज अगदी खोलवर रूजल्या गेले आहे असे मानले पाहिजे.
श्रीमदभागवतात तर खूप सा-या भगवतभक्तांच्या चरित्राचे वर्णन आलेले आहे. पण त्यात धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्र वर्णनाला अधिक जास्त महत्व आहे. श्रीशुकदेवजी यांच्या चरित्राला तर इतके महत्व आहे की श्रीमदभागवताच्या संहितेत त्यांचा उल्लेख "श्रीशुकदेवजी" असाच आलाय. संहितेत फ़क्त भगवंतांचा उल्लेख "श्रीभगवान" असा आलाय आणि त्यांच्यानंतर श्री शुकदेवांचाच असा उल्लेख आलाय.
या चार चरित्रांनाच इतके महत्व का प्राप्त झालेय ? याचा अधिक खोलात जाऊन विचार करताना आपल्या लक्षात येईल की या चौघांचीही चरित्रे श्रीमदभागवताच्या मूळ हेतूशी अत्यंत पूरक आणि श्रीमदभागवताचे ब्रीद पोषक अशी आहेत. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीदवाक्य आहे आणि तीच त्या ग्रंथाची फ़लश्रुतीही आहे. श्रीमदभागवत वाचायचे ते वैराग्य मनात यावे म्हणूनच. "विगतः रागः यस्मान सः विरागः" अशी वैराग्य शब्दाची फ़ोड होईल. या सृष्टीतल्या कुठल्याची चर आणि अचर गोष्टीत ज्याचे रमणे संपले तो विरागी पुरूष. एका भगवंतावाचून सृष्टीत दुसरे कुणीही नाही हे ज्याला जाणवले तो विरागी माणूस.
मग धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्रात हे वैराग्य कसे आहे ? याचा आपण क्रमशः विचार करूयात.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध व्दितीया, १८/१०/२०२०)
या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)
आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.
तुझेच देणे तुलाच अर्पण.
पिस्ता : एक उपेक्षित सुकामेवा आणि त्याचे पुरण, sorry पुराण.
तुमच्या आमच्यासारख्यांच्या घरात बदाम, अक्रोड, किसमिस, काजू आदि सुकामेवा आपण नियमितपणे आणत असतोच.
Saturday, October 17, 2020
जयजय स्वसंवेद्या.
परमेश्वराचे स्वरूप वर्णन करताना ज्ञानोबामाऊलीने पहिल्याच ओवीत "जयजय स्वसंवेद्या" ही संज्ञा वापरली आहे. जो भगवंत (जे परमतत्व) भक्तांना स्वतःच्या संवेदनांव्दारे ओळखू येईल असा आहे, तो स्वसंवेद्य.
भगवंताला जाणण्याकरिता इतर कुठलाही मार्ग नाही. हा ज्याच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा आणि स्वतःच्या जाणिवेचा प्रश्न आहे. किती सोपी आहे नं भगवंताला जाणणे ?
पण आपण प्रांजळ विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळ्यात कठीण आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींवर आपण आपला ताबा मिळवू शकतो पण आपले मन आपल्या ताब्यात येणे ही दुरापास्त गोष्ट आहे. आणि त्या मनाच्या संवेदनेनेच भगवंताला ओळखायचे आहे. मग आपल्यासारख्या साधकांची so near yet so far अशी अवस्था भगवंताबाबत झाली नाही तरच नवल.
याठिकाणी आपल्या सदगुरूंची भूमिका येते. आपल्याला भगवंत जाणून घेण्याच्या मार्गावर, आपले मार्गदर्शक म्हणून, आपले सदगुरू उभे असतात. त्यांनी ते तत्व जाणले असते. त्या तत्वाचा अनुभव घेतलेला असतो. आणि आपल्यालाही तो अनुभव मिळावा म्हणून त्यांची सगळी धडपड असते. बर हा बाह्य अनुभव असता तर त्यांनी आपल्यासाठी तो रेडीमेड आणून दिलाही असता पण हा अनुभव प्रत्येकाच्या अंतरात्म्याने घ्यायचा आहे. म्हणून खरे सदगुरू आपल्या भक्ताचे मन, भक्ताचा अंतरात्मा, भगवंत जाणण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.
भक्ताची एकदा पूर्ण श्रद्धा आपल्या सदगुरूंवर बसली आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने तो काटेकोरपणे चालायला लागला की एका क्षणी त्याला जी अनुभूती येते तो आपल्या अंतःकरणाचा थरकाप उडवणारी असते. आपण ज्या परब्रम्हाच्या, भगवंताच्या शोधात आजवर आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने चाललो आहे, ते परब्रम्हतत्व म्हनजे दुसरे तिसरे कुणीही नसून आपले सदगुरूच आहेत.
आणि याहूनही पुढल्या टप्प्याची उत्कट जाणीव म्हणजे, भक्त सदगुरूंचे स्वरूप जाणल्यानंतर स्वतःच सदगुरूरूप होतो. "विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला तुका विठ्ठलची झाला" ही तुकाराम महाराजांची अनुभूती याच पठडीतली आहे, नाही ?
तयार आहात सगळे ही अनुभूती घ्यायला ? फ़क्त ही अनुभूती अंतरात्म्याने घ्यायची आहे, बाह्यांगाने कुणाला कळणार नाही, दाखवताही येणार नाही. स्वसंवेद्य असा हा अनुभव प्रत्येकाने स्वतःच्याच अंतर्मनाने घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन, आश्विन शुद्ध प्रतिपदा, १७/१०/२०२०.
(कृपया लेखकाच्या नावासकट लेख शेअर करावा ही नम्र विनंती.)