देवासी परम सख्य करावे I प्रेम प्रीतीने बांधावे
I
आठवे भक्तीचे जाणावे I लक्षण ऐसे II
देवाच्या सख्यत्वासाठी I पडावी जिवलगांसी तुटी
I
सर्व अर्पावे सेवटी I प्राण तोहि वेचावा II
मेघ चातकावरी वोळेना I तरी चातक पालटेना I
चंद्र वेळेसि उगवेना I त-ही चकोर अनन्य II
ऐसे असावे सख्यत्व I विवेके धरावे सत्व I
भगवंतावरील ममत्व I सांडूचि नये II
सखा मानावा भगवंत I माता पिता गण गोत I
विद्या लक्ष्मी धन वित्त I सकळ परमात्मा II
पाहता देवाचे कृपेसी I मातेची कृपा कायसी
I
माता वधी बाळकासी I विपत्ती काळी II
देवे भक्त कोण वधिला I कधी देखिला न ऐकिला
I
शरणागतासि देव झाला I वज्रपंजरू II
देव प्रीती राखो जाणे I देवासी करावे साजणे
I
जिवलगे आवघी पिसुणे I कामा न येती II
म्हणोनि सख्य देवासी करावे I हितगुज तयासी सांगावे
I
आठवे भक्तीचे जाणावे I लक्षण ऐसे II
या सख्यभक्ती नावाच्या समासात श्रीसमर्थ आपण सर्व
साधकांना भगवंताशी सख्य कसे असावे याबद्दल सांगताहेत. चातक पक्षी पाऊस पडो न पडो मेघांवर
जसा रागावत नाही, चांदणे उगवो न उगवो चकोर पक्षी जसा चंद्रावर न रागावता त्याच्याशी कायम सख्यत्व साधत
असतो तसे सख्यत्व आपले आणि परमेश्वराचे असावे अशी श्रीसमर्थांची मनोमन इच्छा आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव
तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(भाद्रपद शुद्ध द्वादशी, शके १९४४ , दिनांक ०७/०९/२०२२)
No comments:
Post a Comment