प्राणी संकल्पे बांधला I जीवपणे
बद्ध झाला I
तो विवेके मुक्त केला I साधुजनी
II
पापपुण्य समता घडे I तरीच नरदेह
जोडे I
येरवी हा जन्म न घडे I हे व्यासवचन
भागवती II
बहुत जन्मांचे अंती I होय नरदेहाची
प्राप्ती I
येथे न होता ज्ञाने सदगती
I गर्भवास चुकेना II
अनेक जन्म आणि आणि अनेक मरण
सोसल्यानंतर जेव्हा पाप आणि पुण्याचा हिशेब समसमान होतो तेव्हा हा दुर्लभ असा मनुष्यदेह
मिळतो. या जन्मात आपल्याला लाभलेल्या विचार, विवेक या विशेषाधिकाराचा वापर करून जर
आपण सदगती प्राप्त करून घेतली नाही, जन्ममरणाचा फ़ेरा चुकविणारे कर्म केले नाही तर आपण
पुन्हा या फ़े-यात वारंवार अडकत राहू अशी आपण सर्व साधकांविषयीची काळजी श्रीसमर्थांना
येथे वाटते आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध पंचमी, ललिता
पंचमी शके १९४४ , दिनांक ३०/०९/२०२२)
No comments:
Post a Comment