Friday, September 9, 2022

देवाचिये द्वारी - ६२

 


सदगुरूविण जन्म निर्फ़ळ I सदगुरूविण दुःख सकळ I

सदगुरूविण तळमळ I जाणार नाही II

 

जैसे नेत्री घालिता अंजन I पडे दृष्टीस निधान I

तैसे सदगुरूवचने ज्ञान I प्रकाश होये II

 

असो जयासी मोक्ष व्हावा I तेणे सदगुरू करावा I

सदगुरूविण मोक्ष पावावा I हे कल्पांति न घडे II

 

श्रीमददासबोधाच्या पाचव्या दशकाच्या पहिल्याच, गुरूनिश्चय नावाच्या समासात श्रीसमर्थ सदगुरूची महती गात आहेत. सदगुरूवीण साधक किती अपूर्ण आहे याचे विवेचन श्रीसमर्थ या समासात करताहेत. ज्या साधकाला मोक्ष साधायचा आहे त्याला सदगुरूशिवाय पर्यायच नाही असे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध चतुर्दशी, अनंत चतुर्दशी शके १९४४ , दिनांक ०९/०९/२०२२)


No comments:

Post a Comment