Tuesday, September 13, 2022

देवाचिये द्वारी - ६६

 


संसारसंगे सुख जाहले I ऐसे देखिले ना ऐकिले I

ऐसे जाणोन अनहित केले I ते दुःखी होती स्वये II


प्रपंच सुखे करावा I परी काही परमार्थ वाढवावा I

परमार्थ अवघाचि बुडवावा I हे विहीत नव्हे II


असो ऐसे गुणावेगळे I ते सच्छिष्य़ आगळे I

दृढ भावार्थे सोहळे I भोगिती स्वानंदाचे II


श्रीसमर्थांचा प्रपंचासह परमार्थ साधण्यावर भर आहे खरा पण नुसता प्रपंच करणारे शिष्य त्यांना नकोत हे या समासावरून लक्षात येईल. प्रपंच सुखाचा करावा पण परमार्थ बुडवून नव्हे हे त्यांचे आग्रहाचे प्रतिपादन आहे. प्रपंच चांगला करताना परमार्थही साधता आलेला शिष्य़ हा सच्छिष्य हे सर्व साधकांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण तृतीया, शके १९४४ , दिनांक १३/०९/२०२२)

No comments:

Post a Comment