विघडले देव आणि भक्त I जीवशीवपणे
द्वैत I
तया देवभक्त येकांत I करी तो
सदगुरू II
शिष्यात न लाविती साधन I न
करवी इंद्रियेदमन I
ऐसे गुरू आडक्याचे तीन I मिळाले
तरी त्यजावे II
जो कोणी ज्ञान बोधी I समूळ
अविद्या छेदी I
इंद्रियेदमन प्रतिपादी I तो
सदगुरू जाणावा II
अंतरी शुद्ध ब्रम्हज्ञान I
बाह्य निष्ठेचे भजन I
तेथे बहु भक्त जन I विश्रांति
पावती II
श्रीसमर्थ श्रीमददासबोध या
आपल्या ग्रंथामधून गुरूलक्षणांची सर्व सत्शिष्यांना ओळख करून देताहेत. अर्थात या सदगुरूलक्षणांमधून
शिष्यांच्याही जीवनात गुरूप्राप्तीनंतर काय काय बदल शिष्यांनी अनुभवले पाहिजेत याचेही
मार्गदर्शन श्रीसमर्थ करताहेत. गुरू आपल्याला लाभलेत तर आपल्या जीवनाचे काय व्हायला
हवे हे जर शिष्यांनी ध्यानात घेतले तर त्यांचेही कल्याणच होईल.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(भाद्रपद पौर्णिमा, शके १९४४
, दिनांक १०/०९/२०२२)
No comments:
Post a Comment