सृष्टी बहुरंगी असत्य I बहुरूपाचे
हे कृत्य I
तुज वाटे दृश्य सत्य I परी
हे जाण अविद्या II
अस्तिचा देही मांषाचा डोळा
Iपाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा I
तो ज्ञाता नव्हे आंधळा I केवळ
मूर्ख II
दृष्टीसी दिसे मनासि भासे
I तितुके काळांतरी नासे I
म्हणोनि दृश्यातीत असे I परब्रह्म
ते II
या सृष्टीत जे जे दिसते, मनाला
भासते ते सगळे नाशिवंत आहे म्हणून ते सगळे परब्रह्म नाही. या सृष्टीतले एकमेव अविनाशी
तत्व, परब्रह्म हे जाणून घ्यायला देहाचा आणि देहातल्या पंचज्ञानेंद्रियांचा आधार अपुरा
पडेल.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध द्वितीया शके
१९४४ , दिनांक २७/०९/२०२२)
No comments:
Post a Comment