Sunday, September 11, 2022

देवाचिये द्वारी - ६४

 


सदगुरूविण सच्छिष्य I तो वाया जाय निःशेष I

का सच्छिषेविण विशेष I सदगुरू सिणे II

 

अथवा गुरू पूर्ण कृपा करी I परी शिष्य अनाधिकारी I

भाग्यपुरूषाचा भिकारी I पुत्र जैसा II

 

मुख्य सच्छिष्याचे लक्षण I सद्गुरूवचनी विश्वास पूर्ण I

अनन्यभावे शरण I त्या नाव सच्छिष्य II

 

जो संसारदुःखे दुखवला I जो त्रिविधतापे पोळला I

तोचि अधिकारी झाला I परमार्थविषी II

 

जो सदगुरूवचने निवाला I तो सायोज्यतेचा आखिला I

संसारपांगे पांगिला I न वचे कदा II

 

श्रीमददासबोधाच्या पाचव्या दशकाच्या तिस-या शिष्यलक्षण नावाच्या समासात श्रीसमर्थ शिष्यांची कर्तव्ये आणि लक्षणे सांगत आहेत. एखाद्या थोर सदगुरूच्या शिष्याने जर आपल्या गुरूच्या शिकवणुकीप्रमाणे आपली वागणूक ठेवली नाही तर अत्यंत भाग्यवान माणसाच्या अभागी पुत्राकडे जसे जग पाहते तसे त्याकडे सगळी मंडळी बघतील असे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद कृष्ण प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक ११/०९/२०२२)


No comments:

Post a Comment