म्हणौनि हे दृश्यजात I आवघेचि
आहे अशाश्वत I
परमात्मा अच्युत अनंत I तो
या दृश्यावेगळा II
दृश्यावेगळा दृश्याअंतरी I
सर्वात्मा तो सचराचरी I
विचार पाहता अंतरी I निश्चये
बाणे II
संसारत्याग न करिता I प्रपंच
उपाधी न सांडता I
जनामध्ये सार्थकता I विचारेचि
होये II
हे प्रचितीचे बोलणे I विवेके
प्रचित पाहणे I
प्रचित पाहे ते शाहाणे I अन्यथा
नव्हे II
या जगात दृश्य असलेल्या गोष्टींपासून
वेगळा असलेला तरीही सगळ्या जगात व्यापून असलेला परमात्मा जाणून घ्यायला मनुष्यमात्राला
विचारांचा्च आधार घ्यावा लागेल असे श्रीसमर्थ सांगताहेत. सर्वसामान्य मनुष्याने आपली
विहित कामे न सोडता विचाराने विवेकाने वागून या जगात आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे
असे श्रीसमर्थांना वाटत आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध तृतीया शके १९४४
, दिनांक २८/०९/२०२२)
No comments:
Post a Comment