असो ऐसिया समस्तां I येक ब्रम्हा
निर्माणकर्ता I
या ब्रम्हयासहि निर्माणकर्ता
I कोण आहे II
ब्रम्हा विष्णू आणि हर I त्यांसि
निर्मिता तोच थोर I
तो वोळखावा परमेश्वर I नाना
यत्ने II
म्हणोनि देव वोळखावा I जन्म
सार्थकचि करावा I
न कळे तरी सत्संग धरावा I म्हणिजे
कळे II
ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या
देवशोधन नावाच्या सहाव्या दशकाच्या देवशोधन या पहिल्या समासात श्रीसमर्थ आपल्याला देव
कोण आणि त्याला सोप्या रितीने कसे प्राप्त करून घ्यावे याचा उपदेश करत आहेत. चांगल्या
माणसाच्या सहवासात राहिल्याने आपल्याला देव ओळखता येईल हा श्रीसमर्थांचा दृढ विश्वास
आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(भाद्रपद कृष्ण नवमी, अविधवा
नवमी शके १९४४ , दिनांक १९/०९/२०२२)
No comments:
Post a Comment