शाब्दिक बोले उदंड वाचा I लेश
नाही वैराग्याचा I
अनुताप धारिष्ट्य साधनाचा
I मार्ग न धरी II
आर्जव नाही जनासी I जो अप्रिये
सज्जनासी I
जयाचे जीवी अर्हिणेसी I परन्यून
वसे II
असो ऐसे मदांध बापुडे I तयांसी
भगवंत कैसा जोडे I
जयांस सुबुद्धि नावडे I पूर्वपातकेकरूनी
II
श्रीसमर्थांनी चांगल्या शिष्यांची
लक्षणे जशी सांगितली आहेत तशीच वाईट शिष्यांचीही लक्षणे आपल्याला इथे सांगितली आहेत.
ज्याच्या अंतरात वैराग्याचा लवलेश नसतानाही जो शिष्य केवळ शब्दज्ञान पाजळतो, त्याची
पूर्वपातके त्याच्या कर्मापेक्षा बलवान ठरतात आणि त्याच्यावर सदगुरूकृपा झाली तरी या
सगळ्या गोष्टींमुळे ते शेवटास जात नाही, त्याला भगवंत भेटत नाही अ्सा श्रीसमर्थांचा
उपदेश आहे.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(भाद्रपद कृष्ण द्वितीया, शके
१९४४ , दिनांक १२/०९/२०२२)
No comments:
Post a Comment