जेणे केले चराचर I केले सृष्ट्यादि व्यापार I
सर्वकर्ता निरंतर I नाम ज्याचे
II
तेणे केल्या मेघमाळा I चंद्रबिंबी
अमृतकळा I
तेज दिधले रविमंडळा I जया देवे
II
सर्वकर्ता तोचि देव I पाहो
जाता निरावेव I
ज्याची कळा लीळा लाघव I नेणती
ब्रम्हादिक II
ऐसे जग निर्मिले जेणे I तो
वेगळा पूर्णपणे I
येक म्हणती मूर्खपणे I जग तोचि
जगदीश II
एवं जगदीश तो वेगळा I जग निर्माण
त्याची कळा I
तो सर्वांमध्ये परी निराळा
I असोन सर्वी II
म्हणोनि जग मिथ्या साच आत्मा
I सर्वापर जो परमात्मा I
अंतर्बाह्य अंतरात्मा I व्यापूनि
असे II
हे जग ज्याने निर्माण केले
तो परमात्मा आणि त्याची निर्मिती असलेले हे जग ह्या दोन्हीही गोष्टी एकमेकांपासून वेगळ्या
आहेत. परमात्मा अविनाशी आणि स्थिर आहे. जग निर्मितीच्या पूर्वी तो होताच, या जगातल्या
सर्व चर आणि अचर गोष्टींमध्ये तो आहेच आणि जगाच्या विनाशानंतर तो एकटाच शिल्लक असणार
आहे. म्हणून आपल्या दृष्टीला दिसणारे हे जग तात्पुरते आणि खोटे आहे तर परमात्मा हा
कायम आणि एकमेव खरी वस्तू आहे असे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.
II निवृत्ती ज्ञानदेव सोपान
मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II
II जयजय रघुवीर समर्थ II
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर
(आश्विन शुद्ध चतुर्थी शके
१९४४ , दिनांक २९/०९/२०२२)
No comments:
Post a Comment