Thursday, September 8, 2022

देवाचिये द्वारी - ६१

 


भक्त म्हणजे विभक्त नव्हे I आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे I

विचारेविण काहीच नव्हे I समाधान II

 

तस्मात विचार करावा I देव कोण तो वोळखावा I

आपला आपण शोध घ्यावा I अंतर्यामी II

 

येक मुख्य परमेश्वरू I दुसरी प्रकृती जगदाकारू I

तिसरा आपण कैचा चोरू I आणिला मध्ये II

 

आपण मिथ्या साच देव I देव भक्त अनन्यभाव I 

या वचनाचा अभिप्राव I अनुभवी जाणती II

 

पंचमहाभूतांमध्ये आकाश I सकळ देवांमध्ये जगदीश I 

नवविधा भक्तिंमध्ये विशेष I भक्ति नवमी II

 

ऐसी हे नवविधा भक्ती I केल्या पाविजे सायोज्यमुक्ती I 

सायोज्यमुक्तीस कल्पांती I चळण नाही II

 

आत्मनिवेदन भक्ती या नवव्या भक्तीत भक्त आणि भगवंतामध्ये अनन्य भाव कसा असावा याचा सुरेख उपदेश श्रीसमर्थ आपणा सर्वांना करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक ०८/०९/२०२२)


No comments:

Post a Comment